VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/मार्कंडादेव,१६-०२-२०२४::- विदर्भाची काशी म्हणुन ओळखा असलेल्या व गडचिरोली चंद्रपूर व ईतर जिल्हयातील भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या मार्कंडा स्थित महामृत्युंजय मार्कंडेश्वर मंदिराचे उत्तर वाहीनी मंदिर पुरातत्व विभागाच्या उदासिन धोरणामुळे मागील आठ ते दहा वर्षापासून नादुरस्त अवस्थेत पडुन आहे. भाविक भक्तांकडुन व लोकप्रतिनीधी कडुन अनेक प्रयल झाल्यानंतर व शासनाकडुन निधी मंजुर झाल्यानंतर सुध्दा प्रशासन व पुरातत्व विभागाच्या उदासिन धोरणामुळे मंदिराचे जीर्णोब्दार होवु शकले नाही. याची खंत अनेक भाविक भक्तांच्या मनात आहे. भाविक भक्तांच्या मनाची दखल घेत हरणघाट निवासी श्री. संत मुर्तीधर महाराज यांनी पुढाकार घेत जीर्णाव्दाराच्या कामाकरीता १६ फरवरी २०१४ रोजी जनआंदोलनक रण्याचा निर्धार केलेला आहे.
यात सर्व भाविक भक्तांनी उत्सपूर्थ सहभाग घेवून होणाऱ्या जनआंदोलनात सहभागी व्हावे हि नम्र विनंती केली आहे..
आंदोलनाची रुपरेषा पुढील प्रमाणे राहील.
कार्यक्रम दिनांक १६ फरवरी २०२४ रोज शुक्रवार दुपारी १२.०० वाजता.
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
स्थळ : इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
दि. १६ फरवरी २०२४ ते सायंकाळी ४.०० वाजेपासुन ते दि. २५ फरवरी २०२४ पर्यंत मार्कंडादेव येथे साखळी उपोषण दिनांक २२ फरवरी २०२४ रोज गुरुवारला मार्कंडादेव येथे आमरण उपोषण.
