VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांना पुरातत्त्व विभागाचे अप्पर महानिर्देशक आलोक त्रिपाठी यांचे आश्वासन.
दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात घेतली भेट.
दिल्ली,१७-०२-२०२४::-मागील ८-९ वर्षांपासून पुरातत्त्व विभागाने मार्कंडा देवस्थानाच्या दुरुस्तीचे घेतलेले काम अजूनही सूरू न केल्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिल्ली येथे पुरातत्त्व विभागाचे अप्पर महानिर्देशक आलोकजी त्रिपाठी यांची भेट घेऊन मार्कंडा देवस्थानाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी केली असता पुढील ७ दिवसात मंदिराचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी आमदार महोदयांना दिले.
या भेटीच्या प्रसंगी आमदार महोदयांनी मार्कंडा देवस्थानाचे काम सुरू न झाल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये असलेला आक्रोश व विविध आंदोलनाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी पुन्हा या मागणीचे लेखीपत्र भेटीच्या वेळी आलोकजी त्रिपाठी यांना दिले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.
