VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी, १७-०२-२०२४ ::-चामोर्शी शहरातील सादूबाबा नगरतील रहिवासी वडेट्टीवार यांच्या घरालगत असलेल्या नालिमध्ये साप असल्याची माहिती चामोर्शीतील प्रसिद्ध सर्पमित्र गंगेश अल्लीवार यांना फोन द्वारे देण्यात आली. माहिती मिळतात अल्लीवार यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन सापाला पकडले आणि चामोर्शी वन विभाग कार्यालयात माहिती देऊन दोन तोंडी सापाला जंगलामध्ये नेऊन जीवनदान दिले.
आणि दोन दिवस आधी गुरुवार ला सुधा भिवापूर रोडवर ९ फुट अजगर सापाला पकडून सर्पमित्र गंगेश अल्लिवार यांनी जीवनदान दिले होते.
