VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/सिरोंचा,१७-०२-२०२४::- भारत भ्रमण च उद्देश ठेवून 325 दिवसाचा प्रवास करताना बिहार झारखंड व छत्तीसगड च प्रवास करुन आलेल्या उच्च शिक्षित व एथलीट आशुतोष बेल्लुर ह्यांचे भाग्यश्री ताई आत्राम ह्यांचा मार्गदर्शनात सिरोंचात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्वागत, सत्कार व निवास व्यवस्था करन्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगदिश रालबंडीवार, रवी सुल्तान व इतर लोक उपस्थित होते. 
रात्री आशुतोष ह्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करून त्यांना चहापाणी जेवण व निवासाची व्यवस्था करन्यात आली. सकाळी त्यांना अल्पोहार ची व्यवस्था करून त्यांना पुढच्या तेलंगाना च्या प्रवासासाठी सस्नेह रवाना करन्यात आले. पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
निरोपप्रसंगी आशुतोष बेल्लुर ह्यांनी भाग्यश्री ताई आत्राम ह्यांच धन्यवाद देत उपस्थितीत सर्वांचे आभार मानले.
