VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी.
कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
गडचिरोली/मुलचेरा,२२-०२-२०२४::- आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवकांमध्ये क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत भरपूर गुणवत्ता आणि अनेक गावात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी आपण युवकांना सहकार्य करत असतो.क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपले युवक पुढे जावे आणि आपल भविष्य उज्वल करून या क्षेत्राच नावलौकिक करावे,तसेच युवकांनी क्रीडा स्पर्धेसोबत सामाजिक कार्यात पुढे यावे असे मत कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने कोपरल्ली येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते तर अध्यक्ष म्हणून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम,प्रमुख अतिथी म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष संजीव सरकार,सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ उरेते,महामंत्री सुभाष गणपती,शहराध्यक्ष दिलिप आत्राम,तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक,माजी सरपंच रविभाऊ झाडे,अनु.जाती आघाडी अध्यक्ष प्रफुल दुर्गे,उपाध्यक्ष स्वरूप पोद्दार,बंगाली आघाडी अध्यक्ष मोंटु सरकार,सामाजिक कार्यकर्ते बंडू कुमरे हे होते.
त्यावेळी सर्व मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.लहान मुलींनी सामूहिक नृत्याच सुंदर सादरीकरण केल.
यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग,युवा वर्ग आणि स्थानिक गावकरी,भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
