Saturday, May 23, 2026
HomeEtapalliएटापल्ली तालुक्यात विकास कामांचा धडाका...

एटापल्ली तालुक्यात विकास कामांचा धडाका…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न.

गडचिरोली/एटापल्ली ,२२ फेब्रुवारी२०२४::-तालुक्यातील आदिवासीबहुल व अतिदुर्गम अश्या भागात सध्या विकास कामांचा धडाका सुरू असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

विशेष म्हणजे मंत्रिपद मिळाल्यावर अहेरी विधानसभेसह जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोठी संधी मिळाल्याचे वक्तव्य मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले होते.त्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश येत आहे. आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या एटापल्ली तालुक्यातील बरेच गावात विकास कामांसाठी मोठी निधी मिळाली आहे.यात मुख्य रस्ते,सिमेंट रस्ते,नाली बांधकाम, समाज मंदिर,खडीकरण चे कामे इत्यादींचा समावेश असून नुकतेच कसनसूर,हालेवारा, हेडरी,परपणगुडा,गट्टेपल्ली,मवेली,पुनूर आदी गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी प स सभापती बेबीताई नरोटी,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,राष्ट्रवादी काँग्रेस एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार, नगरसेवक जितेंद्र टिकले, माजी जि प सदस्य संजय चरडुके,संभाजी हिचामी,लक्ष्मण नरोटी,राजू नरोटी,येमलीचे सरपंच ललिता मडावी,अभि नागुलवार,तसेच सरपंच, उपसरपंच आणि विविध गावातील भूमिया,गाव पाटील तसेच नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular