VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी ,२७ फेब्रुवारी २०२४::- ‘स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते. गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनीही स्वतः अतिदुर्गम भागात भेटी देत प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेत शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेवर भर देण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत. मात्र, चामोर्शी शहरात वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी सक्षमपणे करता यावी आणि शहरातील घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नगरपंचायतीने वार्षिक टेंडर काढून लाखो रुपये खर्च खर्च करत असून सुद्धा काही भागात घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 
जसे की दहिगाव या प्रभागात रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा अस्तव्यस्त पडून असलेले दिसून येते, मात्र घनकचरा व्यवस्थापनाची गाड्याने तिथला कचरा न उचलता तो तसाच पडून असल्यामुळे तेथील लोकांना याचा नाहक त्रास होतो. 
आणि चामोर्शी ते मुल या मुख्य रस्त्यावर असलेल्या सादुबाबा मंदिर च्या पुढे वडणावार रस्तेच्या कडेला कार्यक्रमांमध्ये वाचलेला जेवण भात, भाजी तसेच पत्राळी, वाट्या, ग्लास सर्वच आणून इथे टाकतात त्यामुळे कचऱ्याचे ढीग निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे.या मुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्या करिता परिसरातील आणि ये/जा करणार लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र घनकचरा व्यवस्थापनाच्या माणसाला आठ दिवस अगोदर सांगून सुध्दा लक्ष्य देत नाही. अश्या वरून घनकचरा व्यवस्थापनाचे स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
