Friday, September 18, 2026
HomeGadchiroliयुवकांच्या भविष्यास नवी दिशा...

युवकांच्या भविष्यास नवी दिशा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोलीतील भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,

गडचिरोली,०१ जुलै २०२६::- गडचिरोली येथे १ ऑगस्ट २०२६ रोजी पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभागाचे विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी यांच्या पुढाकारातून तसेच गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.

या रोजगार मेळाव्यास आमदार रामदासजी मसराम यांनी प्रमुख उपस्थिती लावून युवकांना रोजगार, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले. शासन व विविध संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित युवकांना केले.

मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झालेल्या युवक-युवतींना जॉईनिंग सर्टिफिकेट प्रदान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देण्यात आल्या. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास आमदार अभिजीत वंजारी, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष समसेर खा पठाण, सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार, माधव गावड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या स्वावलंबी आणि सक्षम भविष्यासाठी हा रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular