Sunday, June 7, 2026
HomeGadchiroliगोंडवाना विद्यापीठाने केले बंगाली भाषा तदर्थ (Ad-hoc) अभ्यास मंडळाचे गठण...

गोंडवाना विद्यापीठाने केले बंगाली भाषा तदर्थ (Ad-hoc) अभ्यास मंडळाचे गठण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश

गोंडवाना विद्यापीठात बंगाली भाषा हा अभ्यासक्रम राबविण्याच्या अनुषंगाने अभ्यास मंडळाचे गठण.

मंडळामध्ये गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक शिक्षक प्राध्यापकांचा समावेश.

गडचिरोली,०५ मार्च २०२४::- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे बंगाली भाषा हा अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये राबविण्याच्या अनुषंगाने माननीय प्र कुलगुरू यांनी बंगाली भाषा तदर्थ (Ad-hoc) अभ्यास मंडळाचे गठन केलेले आहे.

आमदार डॉक्टर देवरावजी यांच्या प्रयत्नातून अखेर बंगाली भाषा या विषयाला धरून मंडळाची स्थापना केल्याने विद्यापीठाचे व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे बंगाली बांधवांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

या मंडळामध्ये गडचिरोली ,चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली भाषिक शिक्षक-प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला असून विद्यापीठांमध्ये बंगाली भाषेमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यास मंडळाची सभा देखील या ७ मार्चला आयोजित करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular