Sunday, June 7, 2026
HomeGadchiroliगडचिरोली पोलीस भरतीत ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देवून...

गडचिरोली पोलीस भरतीत ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण देवून भरती प्रक्रिया राबवा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी.

गृह विभागाचे सचिव व पोलीस महासंचालक यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.

उमेदवारांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना याबाबत दिले होते निवेदन.

गडचिरोली,०५ मार्च २०२४::- गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फत २०२३-२४ करिता ७४२ जागांसाठी पोलिस भरती प्रकिया राबविण्यात येत असून यात ई. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकही जागा नसल्याने ही भरती प्रक्रिया राबवताना शासनाने दिलेल्या ई डब्ल्यू एस व खुल्या प्रवर्गातील आरक्षणाप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊन भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

पोलीस दलामार्फत २०२३-२४ च्या या भरती प्रक्रियेत एकूण ७४२ जागा आरक्षित केल्या असून त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकही जागा नाही , तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी उमेदवारांसाठी ही एकही जागा नाही. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करण्याऱ्या इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे निवेदन निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दिले होते. त्यावेळी आमदार महोदयांनी उमेदवारांना उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन न्याय मागून देण्यासंदर्भात आश्वासन दिले होते आपल्या आश्वासनांची पूर्तता करीत आजच या सर्व उमेदवारांना घेऊन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेत सदर मागणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री मा.नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे गृह विभागाचे सचिव व पोलीस महासंचालक यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular