Saturday, June 13, 2026
HomeEtapalliवनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली च्या वतीने ३ मार्च जागतिक वन्यजीव दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा...

वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली च्या वतीने ३ मार्च जागतिक वन्यजीव दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा…

VAINGANGA NEWS 24 प्रतिनिधी – महिंद्र सुल्वावार

भगवंतराव महाविद्यालय व राजीव गांधी हायस्कूल मध्ये घेण्यात आली स्पर्धा    

१२१ मुलांनी घेतले चित्रकला स्पर्धेत भाग.

गडचिरोली/ एटापल्ली,०७ मार्च २०२४::- भामरागड वनविभाग भामरागड वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली च्या वतीने भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय तथा राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली येथे “जागतिक वन्यजीव” दिनानिमित्य वन्यप्राण्यांवर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.

  सदर चित्रकला स्पर्धा मा.श्री.शैलेश मिना (भा.व.से)उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग यांचे मार्गदर्शनात श्रीमती नीलिमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली,श्री.प्रदीप गेडाम क्षेत्र सहाय्यक एटापल्ली,क्षेत्र सहाय्यक श्री.सी.सी.भेडके,श्री.आर आर गौतम,श्री.एस आर आडे,श्री.एन.एम.मोटघरे, वनरक्षक रवि हेडो,कु.रेशमा कुवर,शेषराज मडावी,कु.ज्योती गोटा,कु.चंद्रकला बोगा,कु.रंजु कोवासी,श्रीमती सुजाता अडगोपुलवार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले असून या कार्यक्रमास भगवंतराव महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.एस.एन.बुटे,प्राध्यापक सुधीर भगत,बी.डी. कोंगरे,प्रा.निलेश दुर्गे,संदीप मैंद,एस.पी.पाटील,राजीव डांगे व तसेच राजीव गांधी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्रीकांत कोकुलवार,शेख सर,गुंडावार सर,चनकापुरे सर,दरो मॅडम,गोपाल सर.बाराई सर हे उपस्थित होते.

वने व वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रदीप गेडाम क्षेत्र सहाय्यक एटापल्ली यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर स्पर्धेत एकूण १२१ मुलांनी भाग घेतला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular