Saturday, June 13, 2026
HomeAheriतालुका क्रीडा संकुलासाठी वाढीव निधी मंजूर,,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश...

तालुका क्रीडा संकुलासाठी वाढीव निधी मंजूर,,मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०७ मार्च २०२४::- जिल्ह्यातील विविध तालुका क्रीडा संकुलाच्या विकास कामासाठी वाढीव निधी मिळावा यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांना पत्र देऊन मागणी केली होती.अखेर शासनाने वाढीव निधी मंजूर केले असून नव्याने मंजूर झालेल्या निधीचा वापर हा तालुका क्रीडा संकुलाच्या नव्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्राधान्याने वापरण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात क्रीडा संकुलाचे बांधकाम या अगोदरच करण्यात आले आहे.मात्र,काही तालुक्यातील क्रीडा संकुलाचे आणखी काही बांधकाम व अत्याधुनिक सुविधेसाठी वाढीव निधी आवश्यक असल्याने मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना वाढीव निधी मागणीच्या अंदाज पत्रकासह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यांनतर वाढीव निधी मागणीच्या अंदाजपत्रकासह कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्यांनी ही मागणी रेटून धरली.अखेर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश आले असून जवळपास २२ कोटींची निधी मंजूर करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सहा तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी मोठी निधी उपलब्ध झाली असून त्याठिकाणी उर्वरित विकास कामे आणि अत्याधुनिक सुविधा पुरविले जाणार आहे.

“कोणत्या तालुक्याला किती निधी”

अहेरी विधानसभा क्षेत्रातील चार क्रीडा संकुलाच्या आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दोन क्रीडा संकुलाच्या विकास कामासाठी निधी मंजूर झाली असून त्यात मुलचेरासाठी ३.९३ कोटी,अहेरीसाठी ३.९३ कोटी, सिरोंचासाठी ३.९३ कोटी, एटापल्लीसाठी २.४३ या व्यतिरिक्त आरमोरीसाठी ३.७९ कोटी आणि वडसासाठी ३.९३ कोटी असे एकूण २१.९४ कोटी रुपयांची निधी मंजूर झाली आहे.

जिल्ह्यातील काही क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वाढीव निधीची आवश्यकता होती.त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.सदर प्रस्ताव राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतली.सदर निधीचा वापर तालुका क्रीडा संकुलातील उर्वरित विकासकामे व नव्या सुविधा निर्माण करण्यासाठी होणार आहे.त्यामुळे त्या त्या तालुक्यातील खेडळूंना दिलासा मिळणार आणि नव्या सुविधा देखील उपलब्ध होणार.

धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन म. रा.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular