VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी, ०८ मार्च २०२४::- रोज गुरूवार ला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा लोकनेता स्व.स्वप्नील वरघंटे यांच्या स्मृतिदिनी (चौदावी)निमित्ताने खासदार अशोक नेते यांनी फुल्लांचे पुष्प टाकुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा यावेळी केली.
या स्मृतिदिनी त्यांच्या आत्म्यास शांति देवो चांगले विचार प्रेरक ठरो यासाठी भजन कीर्तनाचे सुद्धा आयोजन केले होते.
श्रद्धांजली वाहतांना सोबत जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,कामगार मोर्चाचे नेते गोवर्धन चव्हाण,शहराध्यक्ष सोपान नैताम,जेष्ठ नेते माणिक कोहळे, रेवनाथ कुसराम,नरेश अलसावार,निखिल धोडरे,प्रफुल कोतावार,अतुल भिरकुरवार, निरज रामानूजवार तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
