VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/मार्कंडादेव,०८ मार्च २०२४::- महाशिवरात्री यात्रा निमित्ताने खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते सपत्नीकसह शासकीय पद्धतीने मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील पुजाअर्चा करण्यात आली.
विदर्भाची काशी समजल्या जाणारे आपल्या परिसरातील एकमेव मार्कंडा मंदिर आहे. मार्कंडेश्वरावर मनोभावे श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांमध्ये मार्कंडा मंदिर हे पुरातन पवित्र श्रद्धा स्थान मंदिर म्हणून ओळखले जाते.
महा शिवरात्री यात्रा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मोठे प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी खा.नेते यांनी समस्त जनतेला भाविक भक्तांना महाशिवरात्री यात्रा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सोबत महा शिवरात्री पुजनात आमदार डॉ. देवराव होळी, प.पुज्य मुरलीधर महाराज, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे,मार्कंडा देवस्थान समिती चे अध्यक्ष गजानन भांडेकर,नाना महाराज आमगांवकर,पांडे महाराज, अवधूत महाराज आमगांवकर,अर्चना अ.नेते, पुष्पाताई लाडवे तसेच मोठ्या संख्येने मार्कंडेय मंदिरातील महादेवाचे भाविक भक्त बंधू भगिनीं उपस्थित होते.
