Wednesday, July 29, 2026
HomeAshtiखासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट...

खासदार अशोक नेते यांची महाशिवरात्री निमित्ताने चपराळा देवस्थान ला सदिच्छा भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/आष्टी,०८ मार्च २०२४ ::-खासदार अशोक नेते यांनी महाशिवरात्री निमित्ताने चपराळा येथे पं.पुज्य संत श्री. कार्तिक स्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन व हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा येथे विधीवत पुजा अर्चना करत सदिच्छा भेट दिली.

  याप्रसंगी चपराळा देवस्थान च्या भाविक भक्तांसाठी खासदार अशोक नेते यांच्या विकास निधीतून २० लक्ष (विस लक्ष रूपये) स्वच्छतागृह मंजूर करण्याचे आश्ववासित केले.    चपराळा देवस्थान मंदिराच्या कमेटीने खासदार अशोक नेते व खा.नेते यांच्या अर्धांगिनी सौ.अर्चना अ.नेते यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मानसन्माने स्वागत केले.

  यावेळी खा.नेते यांनी चपराळा देवस्थानात येणाऱ्या समस्त जनतेला भाविक भक्तांना महाशिवरात्री यात्रा निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी सोबत लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, चपराळा देवस्थान समिती चे अध्यक्ष संजय पंदिलवार,अर्चना अ.नेते, पुष्पाताई लाडवे तसेच मोठ्या संख्येने चपराळा मंदिरातील भाविक भक्त बंधू भगिनीं उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular