VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/मार्कंडादेव,०८ मार्च २०२४::- विदर्भाची काशी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव स्थानात महाशिवरात्री उत्सवानिमित्त शुक्रवारपासून दहा दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भाची काशी आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेवं येथील पुरातन मार्कंडेश्वर मंदिरात व चपराळा येथे आज पासून महाशिवरात्री निमित्त ‘हर हर हर महादेव’चा गजर ऐकायला मिळातो. 
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे प्रसिद्ध पुरातन मार्कंडेश्वर मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तिरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे, या मंदिराला विशेष महत्त्व आहे.
महाशिवरात्रीनिमित्त जवळपास १० दिवस येथे खूप मोठी यात्रा भरत असते. यात्रेदरम्यान लहान-मोठ्या दुकानांसह अनेक मनोरंजनाची (मिनी बाजार) साधने येथे लावली जातात. त्यामुळे, या यात्रेदरम्यान करोडो रुपयांची उलाढालही होत असते.
“पंचायत समितीच्या चामोर्शी कडू भाविकांसाठी विशेष व्यवस्था”
“आपत्ती व्यवस्थापन विभाग कडून भाविकांसाठी व्यवस्था”. 
नदीत अनेक भाविक पवित्र स्नान करतात, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून येथे बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.श्री मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
८ मार्च रोजी पहाटे ४:३० खासदार अशोक नेते यांच्या हस्ते श्री शंकर महादेवाच्या पार्थिवाचा महापूजा शासकीय पद्धतीने संपन्न झाली.सोबत आमदार डॉ.देवराव होळी, सहपरिवास उपस्थित राहून पूजन झाले.१० वा. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
“मार्कंडेश्वर राष्ट्रीय अध्यक्ष गजानन भांडेकर यांना विचारले असता”. 
९ मार्च रोजी व्याहाड येथील रहिवासी मारुती पाटील म्हशाखेत्री यांच्या कुटुंबाकडून टिपूर पूजनाचा विधी पूर्ण होणार आहे. १२ मार्च रोजी मार्कंडेश्वराची सांगता पूजन अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते होणार आहे. त्याच दिवशी दुपारी एक वाजता मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात येणार आहे. ८ ते ९ मार्चपर्यंत भाविकांना सकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. आणि १० मार्चनंतर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनाला परवानगी असेल. भाविकांसाठी जत्रेत महाप्रसाद व पाण्याची सोय करण्यात आली आहे.
“गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून कदक बंदोबस्त”
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांनी ५०० पोलीस अधिकारी व जवानांचा तगडा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ६० पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड आणि सी-60 पथके तैनात करण्यात आली आहेत.
“चपराळा येथील प्रसाद धाम मंदिरात पाच दिवसाची भव्य जत्रा”
चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावाजवळ.श्री हनुमान मंदिर १० किमी अंतरावर आहे.चपराळा येथील प्रशांतधाम मंदिर महाशिवरात्रीनिमित्त भाविक ७ ते ११ मार्च दरम्यान ६९ वी भव्य परिषद प्राथमिक आयोजित केले आहेत. जेणेकरून या वर्षी इथेही महाशिवरात्रीला भाविक लोकांची मोठी गर्दी होईल. शुक्रवारी सकाळी ६ वा.येथे पं.संत श्री कार्तिक स्वामी महाराजांच्या समाधीचे पूजन संत पं.श्री मुरलीधर महाराज हरणघाट यांची उपस्थिती मध्ये केले जाईल. दुपारी १२ वाजता सदिच्छा यात्रा, रात्री ८ वाजता गुरुदेव सेवा भजन मंडळ वढोली यांनी सादर केलेले भजन गाऊया. ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता संत श्री कार्तिक स्वामी महाराज यांचे समाधी अभिषेक पूजा व दुपारी १२ वा.आरती होईल. १० मार्च सकाळी ६.०९ वा.संत श्री कार्तिक स्वामी महाराज समाधी सकाळी १० वाजता तुळशीला अभिषेक पुजन भजन मंडळ आष्टीचे भजन-कीर्तन व ११ मार्च रोजी सकाळी सहा वाजता कै.संत श्री कार्तिक स्वामी महाराजांची समाधी अभिषेक पूजा व आरती, दुपारी १२ वा.गोपाळकाला व महाप्रसाद वाटप केले जाईल. देवस्थान समिती भाविकांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे ही विनंती केली आहे. 
“भाविकांसाठी 75 बसेसचे नियोजन”
महाशिवरात्री मेळ्याच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या वाहतुकीसाठी 75 विशेष बसेसची सोय केली आहे. त्याअंतर्गत गडचिरोली ते मार्कंडादेव 25 बस, चामोर्शी ते मार्कंडादेव 10 बस, सावली ते साखरी घाट 2 बस, व्याहाड ते साखरी घाट 1 बस अशा एकूण 39 बसेसची व्यवस्था गडचिरोली आगाराकडून दुपारी 12 वाजता करण्यात आली आहे. . त्याचबरोबर ब्रह्मपुरी आगारातून मार्कंडादेवपर्यंत 20 बसेस चालवण्यात येणार आहेत. अहेरी आगारातून आष्टी-मार्कंडा-चपराळा या मार्गावर 10 बसेसची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर ब्रहपुरी आगारातून कुरखेडा तालुक्यातील आरतातोंडी मेळा माळपर्यंत 2 बसेस, अहेरी आगारातून 2 अहेरी ते व्यंकटपूर आणि 2 अहेरी ते काळेश्वर अशा एकूण 53 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
