Saturday, June 13, 2026
HomeMulcheraटिकेपल्ली येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव कार्यक्रमाच्या काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच हस्ते...

टिकेपल्ली येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सव कार्यक्रमाच्या काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच हस्ते उद्घाघाटन…

   VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/मुलचेरा,०९ मार्च २०२४::-एका पौराणिक कथेनुसार भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्या दिवशी विवाह झाला, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असे म्हटले जाते.तसेच या दिवशी अनेक जण शंकर-पार्वती यांचा विवाहदेखील लावतात एका पौराणिक कथेनुसार ज्या दिवशी भगवान शिवाचा देवी पार्वतीशी विवाह झाला होता.तो दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.   तालुक्यातील टिकेपल्ली येथील प्राणहिता नदी घाट येते भगवान श्री.शिवशंकर मंदिर ठिकाण दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा टिकेपल्ली येथे भव्य महाशिवरात्री यात्रा महोत्सव मोठ्या उत्सहात भरवण्यात आले आहे.येथील महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येते.या वर्षी सुद्धा यात्रा ठिकाणी वर्धाराज स्वामी भजन मंडळ बोरी,बजरंगबाली नाट्यपुष्प दंडार मंडळ बेरडी संगीत व दिव्या लावलाय पोरीन अर्थात लेख लाडकी बापाची कार्यक्रम आयोजित केली आहे.    या कार्यक्रमाचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.तसेच त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील समस्त नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाला आर्थिक मदत करण्यात आली आहे.त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी भगवान श्री.शिवशंकर यांचे विविध पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चुटगुंटाचे सरपंचां साधना मडावी,प्रमुख अतिथी म्हणुन सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,अहेरी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डाॅ.निसार ( पप्पू ) हकीम,प्रतिष्ठित नागरिक बाबुराव सडमेक,उपसरपंच सुरेश आत्राम,महागाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्रीनिवास आलाम,गणेश चौधरी,राजू दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,कालिदास कूसनाके ग्रामपंचायत सदस्य कोठारी,बालीताई कोरेत ग्रामपंचायत सदस्या,व्यंकटेश धानोरकर,पोलीस पाटील निकाडे साहेब मारोती पुल्लीवार सह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक – भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular