Tuesday, July 28, 2026
HomeSironchaमुस्लिम समाजाचं इदगाहला संरक्षण भिंत मिळणार;भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न...

मुस्लिम समाजाचं इदगाहला संरक्षण भिंत मिळणार;भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

   गडचिरोली/सिरोंचा,०९ मार्च २०२४::-  तालुका मुख्यालयात असलेल्या मुस्लिम समाजाचं इदगाहला संरक्षण भिंत बांधकाम केले जाणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.    तालुक्यात मुस्लिम समाज बांधवांची मोठी संख्या असून या ठिकाणी प्रभाग क्रमांक १० मध्ये असलेल्या इदगाहला संरक्षण भिंत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे याठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम व्हावे अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न लावता संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी विशेष अनुदान योजना अंतर्गत तब्बल १५ लाखांची निधी उपलब्ध करून दिली.

   नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना समाज बांधवांना घेऊन भूमिपूजन केले.आता याठिकाणी सुसज्ज संरक्षण भिंत बांधकाम केले जाणार असून मुस्लिम समाज बांधवांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,रवी रालाबंडीवार,एम डी शानु,गणेश बोधनवार,रंजित गागापुरपवार,एम डी इरफान, ऍड. फिरोज खान,अमजद खान,रियाज खान,इम्रान अली,माजिद अली, सलमान अली,मुजफ्फर खान तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular