Monday, September 14, 2026
HomeEtapalliआम्ही स्वतंत्र देशाचे गुलाम नागरिक,आम्ही सर्व नक्षल समर्थक आम्हाला जेल मध्ये टाका...

आम्ही स्वतंत्र देशाचे गुलाम नागरिक,आम्ही सर्व नक्षल समर्थक आम्हाला जेल मध्ये टाका…

VAINGANGA NEWS 24 प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार

गडचिरोली/एटापल्ली ,१३ मार्च २०२४::- आम्ही सर्व नक्षल समर्थक आम्हालाही आमचा साथीदारप्रमाणे नोटिस द्या जेल मध्ये टाका कारण आम्हाला दमकोंडवाही लोह खदान नको एकदाच तुमचं अडथळा दूर करा . आमचा गुन्हा एकच आहे आम्ही स्वतंत्र देशाचे गुलाम नागरिक.

आम्ही, संयुक्त ग्रामसभा आणि भाकपा एटापल्ली, हे निवेदन दमकोंडवाही लोहखदान प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी आणि नुकतीच प्राप्त झालेल्या नोटीसीबाबत आपल्याला कळवण्यासाठी लिहित आहोत.    आम्ही सर्व नक्षल समर्थक आहोत आणि आम्हालाही आमच्या साथीदारांप्रमाणेच नोटीस देऊन जेलमध्ये टाकण्याची विनंती करतो कारण आम्हाला दमकोंडवाही लोहखदान नको आहे. एकदाच तुमचं अडथळा दूर करा. आमचा गुन्हा हाच आहे की आम्ही स्वतंत्र देशाचे गुलाम नागरिक आहोत. आजही ब्रिटिश साहेबी मानसिकता पोलिस विभागातून गेली नाही. आम्हाला नोटीसी देऊन पोलिस स्टेशन बोलवून असभ्य भाषेत बोलतात. संबंध नसलेल्या गुन्हा बद्दल बॉन्ड लिहून मागतात. आम्हाला नक्षल म्हणून जेलमध्ये टाकायचे आहे किंवा जीवे मारायचे एकदाच निर्णय करून टाका कारण खदानाला विरोध आमचा असणारच आहे.

आम्हाला नको असलेले बरेच विषय विकासाच्या नावाने खदान काम सुरू करण्यासाठी जलद मदत होणारे कामे सुरू आहेत. एका दिवसात पोलिस स्टेशन बनत आहेत परंतु नागरिकानी अनेक वर्षे मागणी केलेले विविध विकासात्मक मागण्या तसेच पडीत आहेत. उदा. २४ तास वीज, नियमित भरपूर बसेस, २४ तास शुद्ध पेय जल नळ योजना , धान व तेंदू पत्ता साठवणूक करण्यासाठी गोडाऊन ,प्रत्येक आरोग्या उपकेंद्रात डॉक्टर आणि मुबलक औषध , गट्टा रस्ता दुरुस्ती, गट्टा येथे पेट्रोल पंप ,गट्टा तालुका मागणी आणि इतर हजारो मागण्या आहेत.

आम्ही आपणास मागणी करतो की:

१) दमकोंडवाही लोहखदान प्रकल्प तात्काळ रद्द करा.

२) नक्षल समर्थक असल्याचा आरोप करून आम्हाला त्रास देणे थांबवा.

३) नागरिकांच्या विकासात्मक मागण्या पूर्ण करा.

जर आपण आमच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडले जाऊ.

नोटीसी देण्यात आलेल्या नागरिकांची नावे-१. निकेश नरोटी २.राकेश आलाम ३. रमेश कवडो ४. जोगा हेडो ५. सत्तू हेडो ६. सुपारी कोवासी ७. मंगेश कोरसा ८. बारसू उइके ९. संजू कोरसा १०. पांडू गोटा ११. पांडू नरोटे १२. मंगेश कोवासी १३. मंगेश नरोटे १४. साधू कोरसा १५. सत्तू दोरपेटी १६. पततू पोटावी १७. रमेश महा १८. धर्मा कोरसा  

वरील विषयानुसार मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार एटापल्ली यांना निवेदन देण्यात आले. 

 निवेदन देताना मा.सैनू गोटा माजी जिप सदस्य , कॉ सचिन मोतकुरवार भाकपा ता.सचिव एटापल्ली ,रमेश कवडो दमकोंडवाही बचाओ समिती अध्यक्ष , मंगेश नरोटि दमकोंडवाही बचाओ समिती सचिव , कॉ. सूरज जककुलवार , राकेश आलाम, कॉ. विशाल पूजजलवार आणि असंख्य नागरिक उपस्थित होते

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular