VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
पुरसलगोंदी येथे कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.
गडचिरोली/एटापल्ली ,२० मार्च २०२४::- एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथे भव्य कार्यकर्ता मेळावा तसेच पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलतांना माजी पालकमंत्री यांनी जल,जंगल व जमिन यांची रक्षा करायला आजवर आदिवासी समाज लढला आहे त्यामुळे या संसाधनावर सर्वप्रथम स्थानिकांचा अधिकार आहे.यावेळी मंचावर उपस्थित प्रशांत आत्राम,मोहन नामेवार,दुलासा मटामी, वनिता ताई कोरमी, सरपंच तोडसा,गणेश गोटा सरपंच उडेरा, गाव भूमिया बबन मटामी, पाठडी नरोटी, पुसू पदा आदी होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले विकास होत असेल त्यात त्यात वाटा मिळणे आणि रोजगार निर्मिती होत असेल तर त्यावर स्थानिकांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे.माझ्या कारकिर्दीत त्याच ऊद्देशाने ऊद्योगांना पाचारण करण्यात आले होते.आज जर स्थानिकांना डावलण्याचा प्रकार होत असेल तर हे योग्य नाही.आपल्याला पुन्हा आपल्या अधिकारासाठी लढा ऊभारावा लागेल अशी परिस्थिती ऊभ्दवु नये यासाठी प्रयत्नशील राहीन.नाईलाजाने लढा ऊभा झाल्यास मी सदैव आदिवासी बांधवांच्या पाठीशी राहीन अशी ग्वाही दिली.राजे अम्ब्रीशराव महाराजांचे नागरीकांनी वाजागाज्याने जोरदार स्वागत केले.कार्यक्रमाला परिसरातील गावातील गावकरी ऊपस्थित होते.
राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी केले भाजपात पक्ष प्रवेश.
पुरसलगोंदी येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्यात दुलसा मटामी ग्रा.पं सदस्य, अशोक नरोटे ग्रा.पं.सदस्य, राजू मुडमा पेसा अध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राजेंच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत केले भाजपात पक्ष प्रवेश.यावेळी राजेंनी त्यांच्या गळ्यात दुप्पटा टाकून पक्षात स्वागत केले.यावेळी अनेक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
