Friday, May 22, 2026
HomeAheriसामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध - भाग्यश्री ताई आत्राम फॅन्स क्लबचा...

सामूहिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध – भाग्यश्री ताई आत्राम फॅन्स क्लबचा अभिनव उपक्रम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,२० मार्च २०२४::- भाग्यश्री ताई आत्राम फॅन्स क्लब तर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल ५१ जोडप्यांचा विवाह सोहळा थाटामाटात साजरा झाला. या विवाह सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत नव वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.

  भाग्यश्री ताई आत्राम फॅन्स क्लब तर्फे राजाराम (खां) येथे मंगळवारी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.राजाराम (खा) परिसरातील छलेवाडा,सुर्यापल्ली, चिरेपल्ली,रायगट्टा, गोलाकर्जी, मरनेला,पत्तिगाव,खांदला,कोत्तागुडम आणि राजाराम यासह आदी गावातील तब्बल ५१ इच्छुक जोडप्यांचा थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला.या जोडप्यांना विवाह नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आले.तर या विवाह सोहळ्यास हजारो वऱ्हाडीसह वधू-वरांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   दरम्यान गावातून भव्य मिरवणूक काढत मंगल अष्टके म्हणत वधू वरांचे नातलग व उपस्थित नागरिक या जोडप्यांवर पुष्प वर्षाव करून शुभेच्छा दिले तर विवाह सोहळ्यानंतर सर्वांनी ठेका धरला.अत्यंत मंगलमय वातावरणात सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.अनेक गरीब कुटुंबांना हा विवाह सोहळा मोलाचा आधार ठरल्याचे दिसून आले.    या सामूहिक विवाह सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बाबा आत्राम,माजी जि प सदस्य ज्ञानकुमारी कौशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्षण येरावार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष किशोर करमे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार,राजारामचे सरपंच मंगला आत्राम,आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम,नगरसेवक श्रीनिवास चटारे,मेडपल्ली चे सरपंच निलेश वेलादी,रेपनपल्लीचे उपसरपंच विलास नेरला,बालाजी गावडे.

   सांबय्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष तथा ग्रा प सदस्य स्वप्नील श्रीरामवार,सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने,अनुराग बेझलवार,सुमित मोतकुरवार,ग्रा प सदस्य सालय्या कंबालवार,दुर्गे मॅडम,लक्ष्मी सिडाम,माया सुनतकर,ज्योती ठाकरे,महेश बाकीवार, राजाराम येथील ग्रा प सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्रीताई आत्राम फॅन्स क्लबचे कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular