Sunday, June 14, 2026
HomeGadchiroliआताची मोठी बातमी: डॉ. नितिन कोडवते व डॉ.चंदा कोडवते यांचा काँग्रेस पक्षाला...

आताची मोठी बातमी: डॉ. नितिन कोडवते व डॉ.चंदा कोडवते यांचा काँग्रेस पक्षाला राम राम…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समक्ष त्यांचा भाजपात प्रवेश.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा झटका.

गडचिरोली,२२ मार्च २०२४::- गडचिरोली/ चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते आणि त्यांच्या पत्नी डॉ.चंदा कोडवते 2019 च्या विधानसभा निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून पराभूत झालेल्या डॉ. चंदा कोडवते यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्ष्यात प्रवेश केला. डॉ.नितीन कोडवते हे लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांनी यासाठी अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या, मात्र या क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे कळताच त्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ते जवळचे मानले जात होते. काँग्रेससाठी हा एक धक्का मानला जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular