Saturday, May 23, 2026
HomeGadchiroli12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात,,आज फक्त दोन नामनिर्देशनपत्र दाखल...

12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात,,आज फक्त दोन नामनिर्देशनपत्र दाखल…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

एकूण 75 नामनिर्देशन अर्जाची उचल.

गडचिरोली,२२ मार्च २०२४::- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात आज दोन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) व विनोद गुरूदास मडावी (बी.आर.एस.पी.) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच आज 8 व्यक्तींनी 29 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 75 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.

12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. त्यानंतर पहिले दोन दिवस कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नव्हते. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular