Sunday, June 14, 2026
HomeGadchiroli12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात,,आज दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल,,२७ मार्च नामनिर्देशकपत्र भरण्याची शेवटची...

12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात,,आज दोन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल,,२७ मार्च नामनिर्देशकपत्र भरण्याची शेवटची तारीख…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

एकूण 81 नामनिर्देशन अर्जाची उचल.

गडचिरोली,२६ मार्च २०२४::- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात आज दोन उमेदवारांनी एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले. भारतीय जनता पार्टी तर्फे अशोक महादेवराव नेते यांनी दोन नामदिर्नेशनपत्र तर बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पक्षातर्फे बारीकराव धर्माजी मडावी यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. यापूर्वी दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. 

नामनिर्देशन सादर करण्यास आता एकच दिवस शिल्लक आहे. आज 3 व्यक्तींनी 11 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 86 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.

12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. आतापर्यंत एकूण 4 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. 27 मार्च ही नामनिर्देशनपत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular