Saturday, August 1, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली म.रा.प्रा. शिक्षक संघाची जिल्हा परिषदेचे नवनियुक्त...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली म.रा.प्रा. शिक्षक संघाची जिल्हा परिषदेचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी ( प्राथ.) सन्माननीय श्री.बाबासाहेब पवार साहेब यांचेशी सदिच्छा भेट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

तसेच वेतन व इतर समस्या विषयी चर्चा.

गडचिरोली,२८ मार्च २०२४::- मा.श्री.बाबासाहेब पवार साहेब,शिक्षणाधिकारी प्राथ. जिल्हा परिषद गडचिरोली येथे नुकतेच नव्याने रुजू झालेले आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सरांचे स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिक्षकांच्या समस्यांवर मा.शिक्षणाधिकारी श्री. पवार साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री वैभव बारेकर साहेब,मा.सहायक प्रशासन अधिकारी श्रीमती आस्कर मॅडम, श्रीमती कुकडकर मॅडम यांचेशी चर्चा करण्यात आली.

   “त्यात प्रामुख्याने”

१) माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन त्त्वरीत करणे. २)यापुढील महिन्यांपासुनचे वेतन नियमित वेळेत होण्यासाठी वेतन प्रक्रियेत गतिमानता आणणे. ३)नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता 7वे वेतन आयोगातील मुळ वेतनाच्या 15 टक्के किंवा 1500/- रुपये याप्रमाणात देणे.

४)बंद झालेली अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब शासन स्तरावरुन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे. ५)गडचिरोली जिल्हातील प्रलंबित असलेल्या सर्व विषयांच्या भाषा, गणित-विज्ञान,सामाजिक शास्त्र च्या रिक्त असलेल्या पदवीधर विषय शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे.

    ६)स्व.मोतीराम सिडाम सर पं.स.मुलचेरा यांची पेन्शन केस त्वरित मंजुर करणे.

७)जि.पि.एफ.ची नापरतावा प्रकरणे त्वरित निकाली काढणे.

८)गडचिरोली जिल्हातील प्राथमिक शिक्षकांची थकीत असलेली वैद्यकीय प्रतिपुर्ती ची देयके व इतर थकबाकी ची देयके त्वरित अदा करणे.    सदर स्वागतपर भेटीच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर,जिल्हा कार्याध्यक्ष शिलाताई सोमनकर, जिल्हा सरचिटणीस आशिष धात्रक,जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिलमवार,जिल्हा उपाध्यक्ष अशोक रायसिडाम,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वासलवार, जिल्हा उपाध्यक्ष लोमेश उंदिरवाडे, गडचिरोली तालुका अध्यक्ष धनेश कुकडे,तालुका सरचिटणीस संजय मडावी, चामोर्शी तालुका कार्याध्यक्ष सिद्धार्थ सोरते,चामोर्शी तालुका उपाध्यक्ष सुनिल सातपुते, गडचिरोली तालुका उपाध्यक्ष प्रकाश कुनघाडकर,धानोरा तालुका संघटक समीर भजे, गडचिरोली तालुका संघटक जगदिश मडावी,आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular