VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,२४ एफ्रिल २०२४::- साधुबाबा कुटी हनुमान मंदिर मुल रोड, बाजार चौक हनुमान मंदिर , पोलीस स्टेशन जवळील हनुमान मंदिर, नाग मंदिर मार्कंड मोहल्ला या मंदिरांना भेट देऊन घेतले दर्शन.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने चामोर्शी शहरातील हनुमान मंदिरात आयोजित विविध कार्यक्रमांना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी भगवान हनुमंताचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.
यावेळी प्रामुख्याने चंद्रकांतजी दोषी, संदीपजी बुरांडे, बारीकराव कुणघाडकर, प्रमोद सोनटक्के, कालिदास आष्टेकर, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जैराम चलाख, अनिल चलाख, नकटु गडकर, बंडू दूधबावरे, सदाशिव वनकर, साईनाथ बुरांडे, गणेश बुरांडे, अमोल चलाख, नितेश खोबे तथा भक्त गण उपस्थित होते.
