Friday, July 31, 2026
HomeGadchiroli२४ वर्षाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू...

२४ वर्षाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२५ एफ्रिल २०२४::- आजकाल युवामध्येही हार्टअटॅकचा धोका वाढला असुन पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकास हार्टअटॅकमुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल २३ एप्रिल रोजी गडचिरोली येथे घडली.

सूरज सुरेश निकुरे (२४) रा. भिकारमौशी ता. गडचिरोली असे मृत युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे किरायाची खोली करून राहत होता. सकाळी ६ वाजता तो नियमित जिल्हा क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी जात होता. दरम्यान, काल मंगळवारी सकाळी सराव करताना काही अंतर धावल्यानंतर त्याच्या छातीत दुखणे सुरू झाले.

त्यानंतर तो मित्रांसोबत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी गेला. मात्र, त्याच ठिकाणी तो चक्कर येऊन पडला. त्याला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरज हा पोलीस खात्यात भरती होऊन सुखी जिवनाची स्वप्ने रंगवित होता. मात्र त्याला नियतिने गाठल्याने त्याच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे. या संदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. सूरजच्या निधनाने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular