Sunday, June 14, 2026
HomeGadchiroliडोक्यावरचे छत गेले, आता कोठे राहावे...

डोक्यावरचे छत गेले, आता कोठे राहावे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

साहित्याची हानी: पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केली आहे.

गडचिरोली,२३ मे २०२४::-  दिनांक 22 मे 2024 रोजी गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, वसा, नगरी, काटली साखरा, येथे चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे घरांचे छत्रे व अन्य पिकांची मोठ्या नुकसान झाले. सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्थांना भरपाई द्यावी अशी मागणी विश्वजित मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी केली.    गडचिरोली तालुक्यातील वसा, पोर्ला, नगरी काटली, साखरा, येथील नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील घरांची पाहणी विश्वजित मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी केली. या चक्रीवादळाने आणि अवकाळी पावसाने अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.

तसेच विजांच्या कडकडाटामुळे टीव्ही, फ्रिज, कुलर, सोलर संच निकामी झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त घरातील छतांचे व शेतीचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी विश्वजित मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी घटनास्थळावरून गडचिरोलीचे प्रभारी तहसीलदार हेमंत मोहरे, व पटवारी रुपलता टेकाम मॅडम, यांना फोन करून नुकसान ग्रस्थाना लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी केली.

पोर्ला, वसा, परिसरातील नामदेव गेडाम, तरकळ दाने योगेश राऊत, मोरेश्वर देशमुख, गोकुळ दाणे, रामकृष्ण पोटे, यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.

यावेळी सुजित राऊत उपसरपंच पोर्ला, मुखरुजी झोडगे सरपंच वसा, अनिल चापले ग्रामपंचायत सदस्य पोर्ला, रमेश इंगळे, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular