Sunday, June 14, 2026
HomeGadchiroliवादळी वाऱ्यात नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करा - आमदार डॉ. देवरावजी...

वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करा – आमदार डॉ. देवरावजी होळी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

पोर्ला येथे वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या कवेलू व टिनाच्या घराचे तातडीनं पंचनामे करण्याची तहसीलदारांना सूचना.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या उपस्थितीत नुकसान झालेल्या घरांची केली पाहणी.

गडचिरोली, २३. मे २०२४::- २२ मे रोजी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पोर्ला येथील कवेलू व टिनाच्या अनेक घरांची पडझड झाली यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली असून या नुकसान ग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला केली आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी गडचिरोलीचे तहसीलदार व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची सूचना केली.

यावेळी लोमेश कोलते, संतोष दशमुखे, अनिल चापले, पांडुरंग भोयर, लोमेश कालसार, संजय निकुरे, गोपाल झोडगे, परशुराम भोयर, नामदेव गेडाम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular