VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
मा.खा.अशोक नेते यांचा १ लाख ४१ हजार ६९६ मताने पराभव,
गडचिरोली,०५ जून २०२४::- लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आज झालेल्या ४ जून रोजी झालेल्या मतगणनेच्या दिवशी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र येथे महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झालेले आहेत.
डॉ नामदेव किरसान यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा जवळपास १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी पराभव केलेला आहे.
आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतलेल्या नामदेव किरसान यांनी कुठेही पिछाडी झाली नाही व जवळपास पूर्ण मतमोजणी च्या फेऱ्या पूर्ण होत पर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवले. व आपला विजय पूर्ण केला.
“कार्यकर्त्यांच्या जल्लोष व विजयी रॅली“
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान हे विजय झाल्याने क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व रॅली काढून जल्लोष साजरा केला.
“गडचिरोली भाजपा कार्यालयात शुकशुकाट”
रोज गजबजलेल्या भारतीय जनता पार्टीच्या चामोर्शी रोडवरील कार्यालयात आज अशोक नेतेंच्या दारुण पराभवाने झाल्याने शुकशुकाट पसरला होता.
