Sunday, June 14, 2026
HomeChamorshiनवेगाव (रै) येथील संसाधन व सामाजिक नकाशा आराखडयांचे सादरीकरण...

नवेगाव (रै) येथील संसाधन व सामाजिक नकाशा आराखडयांचे सादरीकरण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/चामोर्शी ,१७ जून २०२४::- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत यशोदीप संस्था गडचिरोली संगलीत केवळ रामजी हर्डे कृषी महाविद्यालय चामोर्शी तालुक्यातील नवेगाव (रै) गावात संशोधन व सामाजिक नकाशा आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले.

ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थिनी तीन महिन्यासाठी गावात राहत असून ते शेतकऱ्यांकडून व्यवहारिक व्यवहारिक ज्ञान मिळवतात आणि गावाची माहिती जाणून घेण्यासाठी विविध कार्यक्रम राबवतात. त्याच अनुषंगाने ग्रामीण लोकसभागीय मूल्यवलोकना अंतर्गत गावाची परिस्थिती समजून घेण्यासाठी संसाधन व सामाजिक नकाशा तसेच वेन आकृत्याचे विद्यार्थी कडून सादरीकरण करण्यात आले .

सादर प्रात्यक्षिक कार्यक्रम डॉ. प्राचार्य आदित्य कदम ,प्रा .छबिल दुधबळे ,प्रा .श्रीकांत सरदारे,प्रा .प्रलय झाडे , प्रा.डॉ.रेखा समरीत,प्रा. निकिता एनमुले , प्रा .श्रीकांत सरदारे ,प्रा .उषा गजबे यांच्या मार्गदर्शनात पार पाडला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी केतकी बट्टे, प्रणाली बट्टे, खुशाली भानारकर ,शुभांगी बीसेन,पायल बोरकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular