Monday, September 14, 2026
HomeGadchiroliगडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार...

गडचिरोली मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया याच शैक्षणिक सत्रापासून सुरु होणार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संबंधितांना याबाबत निर्देश

अखेर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना मिळाले यश.

मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री ना .हसनजी मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न.

 मुंबई/गडचिरोली,२० जून २०२४ ::-गडचिरोली मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेला या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी मेडिकल कॉलेजच्या या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात आज मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संबंधितांना निर्देशित केले.

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आज मुंबई मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठकीचे आयोजन केले या बैठकीमध्ये गडचिरोली येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशप्रक्रियेसोबतच बांधकामा संदर्भात ,पदभरती संदर्भात, व यासंदर्भात राहिलेल्या अडीअडचणी दूर करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. मेडिकल कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून प्रवेश प्रक्रिया राबवावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 बैठकीला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, कुलगुरू ,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,शिक्षण संचालक, आयुक्त , अधिक्षक अभियंता यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular