VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
मा.खा.अशोकजी नेते. यांचे गडचिरोली शहर व तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन…
गडचिरोली शहर व तालुका भाजपा कार्यकारिणी ची संघटनात्मक बैठक पत्रकार भवनाच्या सभागृहात संपन्न.
गडचिरोली शहर व भाजपा तालुका बैठकीत कार्यकर्तेंशी यांच्याशी संवाद साधत मा.राष्ट्रपती जी यांचे लोकसभेतील भाषण,महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या बजेट व दिलेल्या योजनावर चर्चा करण्यात आले.
गडचिरोली,१६ जुलै २०२४::- भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची गडचिरोली शहर व तालुका भाजपा कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक पत्रकार भवनाच्या सभागृहात गडचिरोली येथे आज दिं.१५ जुलै २०२४ रोज सोमवारी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
यावेळी बैठकि ला मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, ओबिसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे,जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, डॉ. नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, डॉ.मिलींद नरोटे,महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जेष्ठ नेते सुधाकर जी येंनगदलवार,जिल्हा उपाध्यक्ष अरूनजी हरडे,विजय चाटे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोलीत कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला मार्गदर्शन करतांना माजी खासदार यांनी बोलतांना म्हणाले भारतीय जनता पार्टी चे इथे आलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुन्हा भाजपा संघटनेच्या कामाला लागुन बुथ रचना मजबुत करावी.जरी आपला पराभव झाला असेल तरिपण कारणे न शोधता संघटनेच्या कामाला लागावे असा सल्ला देत न थांबता पुन्हा नव्याने जोमाने संघटनेच्या कामाला लागावे.असे मत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी या कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला संबोधित केले.
याबरोबरच पुढे बोलतांना गडचिरोली भाजपा बैठकीत पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत मा.राष्ट्रपती जी यांचे लोकसभेतील भाषण,महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या बजेट व दिलेल्या योजनावर चर्चा करत समस्या समजून घेण्यात आले.
आपल्या राजकीय जीवनाचा उपयोग मी आतापर्यंत समाजाच्या सेवेसाठीच केला,पुढे ही जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार या बैठकी दरम्यान मा.खा.नेते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मोदी सरकारच्या कार्यकाळात मार्गी लावण्यात मला यश आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत लोकसभेत झालेल्या पराभवाची समिक्षा केले.
याप्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांच्यासह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनसमेत तालुका महामंत्री बंडूभाऊ झाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापुन अभिष्टचिंतन सोहळा करून त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
