Sunday, September 13, 2026
HomeGadchiroliगोंड- गोवारी अभ्यास समिती विदर्भ दौऱ्यावर,,सामाजिक संघटनांकडून स्विकारणार निवेदने...

गोंड- गोवारी अभ्यास समिती विदर्भ दौऱ्यावर,,सामाजिक संघटनांकडून स्विकारणार निवेदने…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,१६ जुलै २०२४::- गोंड गोवारी समाजाच्या निवेदनावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. के. एल. वडणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष न्या. वडणे हे विदर्भ दौऱ्यावर असून ते दिनांक 15 व 16 जुलै 2024 रोजी रविभवन, शासकीय विश्रामगृह, नागपुर येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते नागपूर विभागातील गोंड गोवारी समाजाच्या संघटनाचे निवेदन स्विकारणार आहेत. 

गोंड-गोवारी समाजाच्या संघटना तसेच त्यांचे प्रतिनिधी यांना लेखी निवेदने सादर करावयाची असल्यास त्यांनी 15 व 16 जुलै रोजी रविभवन, नागपूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सादर करावी. याप्रसंगी समितीपुढे संघटनेतील प्रतिनिधीला आपले म्हणने थोडक्यात मांडण्यासाठी संधी दिली जाईल, असे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गडचिरोलीचे सहआयुक्त जितेंद्र चौधरी यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular