Saturday, May 23, 2026
HomeChamorshiसतत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे चामोर्शी शहर झाले जलमय...

सतत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे चामोर्शी शहर झाले जलमय…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

नागरिकांचे अन्न धान्यापासून तर सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

“नगरपंचायत चामोर्शीचे पूर्णतः दुर्लक्ष”

   गडचिरोली/चामोर्शी ,२० जुलै २०२४::- सतत येणाऱ्या पावसामुळे चामोर्शी शहरातील अनेक वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच इलेक्ट्रॉनिक सामानाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना आज सकाळी दिनांक 20 जुलैला झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  नगरपंचायत चामोर्शी यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 8,6,5 मध्ये नाली बांधकाम केले नागरिकांना असं वाटलं की नाली बांधकाम झाल्यामुळे पावसाळ्यात येणारा पाणी न थांबता नालीद्वारे निघून जाणार व दरवर्षीप्रमाणे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र यावर्षी सुद्धा वार्ड क्रमांक 8,6,5 या ठिकाणी सतत येणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील प्रभाग क्रमांक 8,6,5 या ठिकाणी बऱ्याच घरामध्ये पाणी घुसल्याने वॉर्डातील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे.     

   सतत येणाऱ्या पावसामुळे घरात पाणी घुसून घर तर पळणार नाही ना असा प्रश्न नागरीकांच्या मनात आलेला आहे.

  घर पडून जीवितहानी झाली तर याला जिम्मेदार कोण असणार असा प्रश्न चामोर्शी शहरातील वार्ड क्रमांक 8,6,5 मधील सूरज नैताम, कुलदीप आत्राम, मुन्ना रंगारी यांनी उपस्थित केलेला आहे,

तसेच केंद्र प्राथमिक शाळा,नूतन शाळा आणी शिवाजी हायस्कूल या ठिकाणी मोठया प्रमाणात पाऊसाचे पाणी असल्या कारणाने शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हे नूतन प्राथमिक शाळेचे दृश्य

हे केंद्र प्राथमिक शाळेचे दृश्य

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular