VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मा. डॉ. नामदेव किरसान साहेब यांचा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे सामूहिक सत्कार
खासदार मा. डॉ. नामदेव किरसान युवक काँग्रेस चे सचिव तथा विदर्भ झोन चे प्रभारी सय्यद अहमद खालीज , महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे , महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार, यांची प्रमुख उपस्थिती.
गडचिरोली,२२ जुलै २०२४::- दिनांक 18 जुलै 2024 रोजी सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मा. डॉ. नामदेव किरसान साहेब उपस्थित होते. तर या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावर भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे सचिव तथा विदर्भ झोन चे प्रभारी सय्यद अहमद खालीज , महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे , यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस नी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची गडचिरोली विधान सभेची तिकिट युवक काँग्रेस च्या कोट्यातून द्यावी असा सुर कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे सचिव तथा विदर्भ झोन चे प्रभारी सय्यद अहमद खालीज यांच्याकडे धरला व त्यांनी अस सांगितलं की दिल्लीला वरच्या नेत्यांकडे लावून धरणार की की विधान सभेची तिकीट युवक काँग्रेस च्या कोट्यातून द्याव असे आश्वासन दिले.
या बैठकीमध्ये चलो पंचायत चलो वार्ड अभियानाच्या माध्यमातून लाडकी बहिण योजना, नव मतदार नोंदणी अश्या विविध शासनाच्या योजना प्रत्येक जन माणसानंपर्यंत पोहचवण्याच काम युवक काँग्रेस करेल अश्या सुचना युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितेश राठोड , महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेसचे सचिव अतुल भाऊ मल्लेलवार , ज्योतिष होनहल्ली सोशल मीडिया इन्चार्ज कर्नाटक, रिजवान भाई, आसिफ शेख , वसंत पाटील राऊत तालुका अध्यक्ष, शंकररावजी सालोटकर जिल्हा उपाध्यक्ष, मंडलवार साहेब, विधानसभा अध्यक्ष महेश जिल्लेवार , सर्वेश पोपट, चमोर्शी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल बारसागडे, घनश्याम मुरवतकर गडचिरोली युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, कुरखेडा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रांजल धाबेकर , कोरची तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिपक हलामी , युवती अध्यक्ष आचल चलकलवार, चारुदत्त पोहाणे, श्रीनिवास ताडपल्लीवार , अनिकेत राऊत, मुन्ना गोंगले, हेमंत कुंभरे, नितेश बहिवार तेजस कोंडेकर, सुधीर बांबोळे, प्रज्वल दहेकर, करण कुलसंगे, आकाश घेर, कमलेश खोब्रागडे, डॉ सोनल कोवे , अभिजीत धाईत, प्रतीक चलाख, सुदर्शन उंदीरवाडे, दीपक हलामी, देवेंद्र कोठारे, अभिषेक चौधरी, मनोज रामटेके, अतुल यलमलवार, आणि मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
