Wednesday, September 30, 2026
HomeDhanoraरांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर...

रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

त्वरीत दुरुस्ती करून रुग्णांची हेळसांड थांबवा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव एड. विश्वजित मारोतराव कोवासे यांची मागणी.

 गडचिरोली/धानोरा,२७ जुलै २०२४::- तालुक्यातील रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली असुन यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती दोन महिन्याअगोदर 15 लाख रुपये खर्च करुन करण्यात आली. तरीही गळती सुरूच असल्याने या दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोग्य प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळ नियोजनामुळे रुग्णालयात ही परिस्थिती ओढवली असून ईथे *विजेची समस्याही आहे.* *स्वच्छता नाही* *जनरेटरची उपलब्धता नसून त्वरीत* अश्या अनेक समस्या आहेत याकडे प्रशासनाने लक्ष देवुन वरील समस्या सोडवाव्या व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी व संबंधीत कंत्राटदारावर कारवाही करावी अशी मागणी *युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव एड. विश्वजित मारोतराव कोवासे* यांनी केली आहे. त्यानी आज धानोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रांगी येथील आरोग्य केंद्राला भेट देवून रुग्णांची विचारपूस केली व येथील समस्या जाणून घेतल्या. व *कार्यकारी अभियंता ला फोन करत या सर्व समस्या सांगितल्या. कार्यकारी अभियंता ने येत्या आठ दिवसांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी येथील दुरुस्तीचे काम करण्यात येईल असे आश्वासन दिले.

रुग्णालयाची पाहणी करतांना धानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कोराम, दिनेश चापले ग्राम पंचायत सदस्य, गडचिरोलीचे प्रभारी पुष्पेंद्र शाहु, भूषण भैसारे, पुरुषोत्तम चिंचोलकर, सोयल पठाण, स्वराज कन्नाके, साहिल कुमोटी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular