VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची पंचायत समिती चामोर्शी बीडीओंना सूचना.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती चामोर्शीच्या कार्यालयात अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात बैठकीचे आयोजन
गडचिरोली/चामोर्शी ,२६ जुलै २०२४::-गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या नोंदणीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसून त्या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नोंदणीच्या अंमलबजावणीसाठी तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी म्हटले आहे.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पत्र व सूचनेनुसार पंचायत समिती चामोर्शीच्या कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात अधिकारी व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला बीडीओ यांचे सह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
