Tuesday, September 15, 2026
HomeGadchiroliशोध, बचावकार्य व बाधित मार्गावर पुरामुळे फसलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले...

शोध, बचावकार्य व बाधित मार्गावर पुरामुळे फसलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढले…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२८ जुलै २०२४::-

१) गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा गावानजिकच्या कुंभी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करायला गेलेले नागरिक अडकून असल्याची माहिती प्राप्त होताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने एकूण 48+11 असे 59 व्यक्तींना बाहेर काढले, ह्यामध्ये 1 अंध व्यक्तींसुद्धा समाविष्ट होते.

  २) मौजा कुंभी मोकासा येथून वैद्यकीय सुविधेची गरज असलेल्या 02 महिला, 01 व्यक्ती ह्यांना नदीच्या पुरातून बोटी द्वारे सुखरूप काढून गडचिरोली मुख्यालयी पोहचवून देण्यात आले.

 ३) मौजा कुंभी मोकासा ता. गडचिरोली व भामरागड मुख्यालयात अनुक्रमे 06 व 23 विद्यार्थी हे मार्ग बंद असल्याने परीक्षेकरिता येऊ शकत नसल्याचे मा. पोलीस अधिक्षक, गडचिरोली ह्यांना कळताच त्यांच्या परीक्षेची संधी जाऊ नये ह्याकरिता प्रशासनाने सदर सर्व विद्यार्थ्यांना SDRF, आपत्कालीन पथक, महसूल/पोलिस पथकांच्या सहाय्याने सर्वाना सुखरूप बोटच्या सहायाने बाहेर काढून वेळीच गडचिरोली मुख्यालयी पोहचविण्यात आले.

  ४) मौजा कुंभी मोकासा येथे जाण्याकरिता आपत्कालीन पथक, SDRF, महसूल/पोलिस पथक/ आपदा मित्र यांच्या सहाय्याने खांद्यावर सुमारे 1 किमी बोट नेऊन 3 नाले/नदी पार करून येथील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

५) ता.क. मौजा रानमूल, ता. गडचिरोली येथील पूराच्या पाण्यात वेढेलेले 02 व्यक्तींना माहिती प्राप्त होताच तात्काळ काढण्याकरिता आज रात्रौ 8.00 वाजता आपातकालीन पथक मोक्यावर पोहचले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular