Saturday, May 23, 2026
HomeChamorshiआदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ नगरपरिषद/ नगरपंचायतील...

आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ नगरपरिषद/ नगरपंचायतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/चामोर्शी,०५ ऑगस्ट २०२४::- नगर पंचायत चामोर्शी कर्मचाऱ्यांतर्फे आज दिनांक ०३/०८/२०२४ ला माननीय आमदार डा. देवरावजी होळी साहेब यांना नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ गडचिरोली जिल्यातील नगर परिषदा व नगर पंचायातींच्या कर्मचाऱ्यांना देण्याबाबत निवेदन देण्यात आले….. महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि. २९/०२/२०२४ नुसार आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या एकस्तर पदोनत्ती वेतनश्रेणीच्या लाभाबाबत स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात आले असून सदर लाभ गडचिरोली जिल्यातील नगर परिषद/नगर पंचायती वगळता इतर सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू आहे. त्याअनुषंगाने सदर लाभ जिल्यातील नगर परिषदा/नगर पंचायती मधील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावे. याबाबत निवेदन देण्यात आले. यावर मा. आमदार महोदयांनी मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेशी याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular