Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आलापल्ली येथील सलीम शेख परिवाराला दिला आधार...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आलापल्ली येथील सलीम शेख परिवाराला दिला आधार…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०५ ऑगस्ट २०२४::- जिल्ह्यातील मागील वीस दिवसांपासून सुरु असलेल्या सतत मुसळधार पाऊसामुळे आलापल्ली येथील सलीम शेख यांची घराची छापरे उन्मळुन पडली होती.घरचीछत घेल्याने घरात राहणे शेख परिवाराला अडचण होत होती.

सदर शेख परिवारांची अडचण काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कानावर पडल्याने त्या शेख परिवाराला अजयभाऊ कंकडालवार कडून ताडपत्री देण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे घरांच्या आतील भागाना अधिक नुकसान होऊ नये म्हणून या ताडपत्री तात्पुरता छाप्पर म्हणून वापरल्या जातील त्यामुळे त्यांना थोडा आसरा मिळेल या उद्देशने काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी ताडपत्री वाटप करण्यात आली आहे.ताडपत्री दिल्याने शेख परिवारातील सदस्यांचा चेहऱ्यावर आनंदची वातावरण दिसून आले.त्यावेळी अजयभाऊंची आभार मानले आहे.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,स्वप्नील मडावी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,डोलेश मडावी,सचिन पांचार्या,अनील बोंधडे,साई कुमरे,सलीम भैय्या शेख,तनवीर शेख,गजानन सोनटक्केसह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular