VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
आनंदग्राम येथील फुटबॉल प्रतियोगितेचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते उद्घाटन.
श्री श्री गणेश स्पोर्ट असोसिएशन आनंदग्राम तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा फुटबॉल प्रतियोगितेचे आयोजन.
गडचिरोली/आनंदग्राम, ६ ऑगस्ट २०२४::-संपूर्ण देशामध्ये क्रिकेटचे वेड असताना गडचिरोली सारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये फुटबॉल सारखी मोठी प्रतियोगिता भरवून लोकांमध्ये फुटबॉल बद्दल उत्साह निर्माण करणाऱ्या आयोजकांचे काम खरोखरच कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आनंदग्राम येथील फुटबॉल प्रतियोगितेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्री श्री गणेश स्पोर्ट असोसिएशन आनंदग्राम तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली च्या वतीने आनंदग्राम येथे फुटबॉल प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले. या उद्घाटन समारंभाला आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंदग्राम येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंदग्राम चे सरपंच उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह फुटबॉल प्रेमी नागरिक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
