Monday, September 14, 2026
HomeUncategorizedसुरजागड, कोनसरी लोह प्रकल्पातून दळवळण करणाऱ्या वाहनांमुळे जिवितहानी थांबविणे, मृतकांच्या परिवारास अपेक्षित...

सुरजागड, कोनसरी लोह प्रकल्पातून दळवळण करणाऱ्या वाहनांमुळे जिवितहानी थांबविणे, मृतकांच्या परिवारास अपेक्षित नुकसान भरपाई मिळन्यात याव्या…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी.

गडचिरोली,१२ ऑगस्ट २०२४::- विषयांकित मागणीच्या अनुषंगाने सुरजागड लोह प्रकल्पातून माल वाहक दळनवळन करणाऱ्या ट्रकांमुळे गडचिरोली-आलापल्ली महा-मार्गावर अपघात होऊन मजूर, प्रवास्यांचा बळी गेलेला आहे. अपघातांची संख्या अद्याप थांबलेली नाही. होणारे नुकसान अक्षम्य तथा भरून न निघणारे आहे. अनेक परिवार निराधार झालेले आहेत. त्यामुळे सदर वाहनाच्या शहरात प्रवेश करण्याच्या वेळा निश्चीत व नियंत्रित करणे गरजेचे आहेत. सका.१० ते दू. १२ तथा सा. ४ ते ६ वाजता पर्यंत शालेय विद्यार्थी कर्मचारी मजूर वर्ग व्यस्त रहदारी असते त्या वेळामध्ये जड वाहनांना शहरात प्रवेश निषिद्ध करण्यात यावे. आतापर्यंत तत्सम अपघाता मध्ये मृत व्यक्तीच्या परीवारास भरीव नुकसान भरपाई, प्रकल्प प्रशासन व शासन यांचे वतीने तात्काळ देण्यात यावे हि विनंती. या व्यतिरिक्त खालील मागण्याचा विचार करून तत्काळ निकाली काढण्यात याव्यात.१) गडचिरोली शहरास आउटर रिंग रोड तयार करण्यात यावे,२) आरटीओ चे चेक पोस्ट तयार करून धरम काटा लावण्यात यावे,३) ट्रक वाहुतीको करिता विशिष्ट वेळेत जेव्हा लोकांचा अवागमन कमी असतो अश्या वेळी करण्यात यावे,४) गावच्या प्रारंभी व अंतिम वेशिष गतिरोधक बसवण्यात यावे,यावेळी उपस्थित समशेखन पठाण प्रदेश प्रतिनिधी, सतीश विधाते शहराध्यक्ष,रमेश चौधरी माजी नगर सेवक,नितेश राठोड युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष,रजनीकांत मोटघरे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष,रुपेश टिकले परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष, सौरभ पा. माशाखेत्री युवक काँग्रेस जिल्हापाध्यक्ष, प्रतीक बारसिंगे प्रदेश सहसचिव,पुषपेंद्र साहू, चारुदत्त पोहने, प्रफुल आंबोरकर, धवल सूचक, अतुल राचमलवार, आनंदराव पारधी, जावेद खान, अभिजित धाईत, कल्पक मुप्पीडवार, दत्तात्रय खरवडे, सर्वेश पोपट, तेजस मडावी, समीर ताजने, निखिल खोब्रागडे आदी उपसाथित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular