
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli,३० ऑगस्ट २०२४::- गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनशील गाव असलेल्या मुलचेरा तालुक्यातील वेंगणुर येथे राज्य सरकारने आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम केले आहे सदर उपकेंद्र अंतर्गत चार गावे येत असून सदर गाव व त्या अंतर्गत येत असलेली गावे ही अतिशय दुर्गम भागात मोडत असून गावातील ग्रामस्थ रोजगाराच्या अभावाने अतिशय गरिबीचे जीवन जगत आहेत.
१) वेंगणूर् या गावापासून मुख्य गाव रेगडीचे अंतर 14 किमी असून सदर रस्ता फारच खराब झाले असल्याने ग्रामस्थांना सदर रस्त्यावरून आवागमन करणे फारच त्रासाचे व जोखमीचे झालेले आहे.
२) वेंगनुर येथील आरोग्य उपकेंद्र नवीन असून व उपचार करण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात उपकेंद्रात सोयी सुविधा नसल्याने गर्भवती महिला व जोखमीच्या रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य नसल्याने गर्भवती माता किंवा जोखमीच्या रुग्णास वेंगनुर येथून आसपासच्या वैद्यकीय केंद्रात जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागते,
३) गावात चार चाकी वाहन नसल्याने खाजगी वाहने मिळणे फार अशक्य आहे व या गावात मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने अशा परिस्थितीत गर्भवती माता व जोखमीच्या रुग्नास वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने धोका होत आहे व अनेक रुग्ण आजपर्यंत दगावले आहेत. व त्यांचा जीव पण गेला आहे त्यामुळे सदर आरोग्य उपकेंद्र वेंगनुर करिता राज्य सरकारने रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथील मुख्यमंत्री सचिवालय येथे नायब तहसीलदार गवारे साहेब यांना याबाबत निवेदन दिले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे साहेब यांनाही निवेदन दिले. यावेळी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्रजी विश्वास, नगरसेवक आशिष पिपरे, मानवाधिकार संघटना विदर्भ अध्यक्ष जावेद अली शेख, मानवअधिकार संघटना कार्यकारी जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी भामरागड तालुका मानवाधिकार संघटना अध्यक्ष भीमराव वनकर गुरुजी व मूलचेराचे मानवाधिकार संघटना पदाधिकारी सत्तू मंडल व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
