Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliगडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौक व रामनगर येथील श्री. गुरुदेव चौकातील तान्हा...

गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौक व रामनगर येथील श्री. गुरुदेव चौकातील तान्हा पोळ्याला मा.खा.नेते यांची उपस्थिती…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

नंदीबैल पोळा बालगोपालांसह विविध वेशभूषेत साजरा.

नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने बक्षीसाचे वितरण मा.खा.नेते यांच्या शुभहस्ते संपन्न.

गडचिरोली,०५ सप्टेंबर २०२४::- गडचिरोली शहरातील रेड्डी गोडाऊन चौकातील नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ तसेच रामनगरातील अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित तान्हा पोळा उत्सवाच्या कार्यक्रमाला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांची उपस्थिती होती. तसेच नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने तान्हा पोळा हा सण लहान बालगोपालांसह मुले आप आपल्या लाकडी नंदीबैलाला सजवित बालगोपाल विविध वेशभूषेत नटवीत सामाजिक प्रतिमा साकारत भव्य तान्हा पोळा महोत्सव आयोजित करून बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला.

या बक्षिस समारंभाला उपस्थित राहून मा.खा.नेते यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रमुख डॉ. मिलिंद नरोटे,ओबीसी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, शिवसेनेचे नंदुभाऊ कुमरे, सामाजिक नेते प्रकाश निकुरे, शेखर साळवे,कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुधाकर जी पेटकर,कामगार आघाडी चे सामाजिक नेते सुरेश मांडवगडे, नगरसेविका अल्का पोहनकर, निलेश बोमनवार, अभि म्हशाखेत्री,रवि भडांगे, नितिन चिमडयालवार,राजूभाऊ बार,राजुभाऊ मल्लेलवार,विनोद आखाडे,विनोद कोटगीलवार, येरणेजी तसेच मोठया संख्येनी शहरातील नागरिक बंधू भगिनीं व बालगोपालांसह गुरुदेव भक्त उपस्थिती होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular