Saturday, May 23, 2026
HomeAshtiआष्टी शहरातील सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार यांच्या ट्रकचे तीन टायर व एका...

आष्टी शहरातील सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार यांच्या ट्रकचे तीन टायर व एका बॅटरीची चोरी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/आष्टी,१४ सप्टेंबर २०२४::- चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरातील सामाजिक कार्यकर्ता संजय पंदिलवार यांच्या चामोर्शी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या संजय पंदिलवार यांच्या स्वतःच्या पल्टवर उभा करून ठेवलेल्या हायवा ट्रकचे तीन टायर व बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळी उघडकीस आली जवळपास अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे ही चोरी रात्री झाली. चोरट्यांनी संगनमत करून ही चोरी केली. चोरट्यांनी हायवा ट्रकचे तीन टायर व बॅटरी चोरून नेली यामुळे आष्टी शहरातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे याकरिता झालेल्या चोरी संबंधात ट्रकचे मालक संजय पंदिलवार यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . या संबंधीची माहिती ठाणेदार विशाल काळे यांना विचारणा केली असता ठाणेदारांनी आपल्याकडे तक्रार दाखल झाली असून त्या चोरट्यांचा आष्टी पोली शोध घेत आहेत असे सांगितले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular