Saturday, May 23, 2026
HomeChamorshiग्रामपंचायत गौरीपुर अंतर्गत येणाऱ्या श्रीनिवासपूर गावातील सी.सी. नाली बांधकामावर दोन सदस्यांचा आक्षेप...

ग्रामपंचायत गौरीपुर अंतर्गत येणाऱ्या श्रीनिवासपूर गावातील सी.सी. नाली बांधकामावर दोन सदस्यांचा आक्षेप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी

Gadchiroli /चामोर्शी,२४ सप्टेंबर २०२४::- जेव्हा शासन स्थरावर एखादा क्षेत्र करिता येणाऱ्या कामाचा अंदाज घेवुन विकास योजना प्रसिध्द केले जाते, मंजुर केले जाते तेव्हा तेथे विकास योजना लागु होते. आपल्याला जिथे परवानगी हवी आहे त्या क्षेत्रात विकास योजना लागु असेल आणी त्या कामा करिता जे क्षेत्र हवी असेल तो क्षेत्र जर गावठाण क्षेत्र मध्ये येत असेल तर त्या बांधकाम करिता ग्रामपंचायतीचा पुर्व परवांगी आवस्यक असते.

परंतु सदरचे काम २० सप्टेंबरला सुरू झाले आहे व सबंधीत ठेकेदार, सबंधीत बांधकाम अभियंता यांच्या कडुन कोनत्याही प्रकारचे परवांगी मांगीतले गेले नाही. सबंधित काम ज्या ठिकाणी आवश्यक आहे तो ठिकाण सोडुन आपल्या मनमानी जागेवर काम करित आहे. व संवंधित ठेकेदार व अधिकारी शासनाच्या निधीचे गैरवापर करिता आपल्या बोगस कारभार सुरू केले आहे.

असा आरोप ग्रामपंचायत सदस्य ह्रिदय बाला व चंदना घरामी यांनी केला आहे.या कारण्यामुळे समस्त गावकरी मध्ये असमाधनाचे रास निर्माण झाले आहे. व भविष्यात या कामाचे देखभाल दुरूस्ती ही आपल्या ग्रामपंचायतीना करायचा आहे.

सदरचे काम हे निकृष्ट दर्जा व थातुर मातुर करून गेले तर या कामात देखभाल दुरुस्ती साठी अजुन ग्रामपंचायतच्या निधीवर याचा बोझा लागनार आहे. हे सुध्दा नकारता येत नाही. सदरचे बिषय हे गंभिर असल्यामुळे याबद्दल ग्रामपंचायत सदस्य हृदय बाला व चंदना घरामी यांनी जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ कडे निवेदनाद्वारे तक्रार केलेली आहे. हे काम तात्काळ थांवविण्यात यावे व संबंधित ठेकेदार व अभियंतावर कारवाई करण्यात यावे.

अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन २३ रोजी संबंधित कार्यालयांमध्ये व देण्यात आले. चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य द्वयी बाला व घरामी यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular