Saturday, May 23, 2026
HomeAheriमाजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सहकार्याने आलापल्ली येथील रस्त्याची दुरुस्ती...

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सहकार्याने आलापल्ली येथील रस्त्याची दुरुस्ती…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी,२४ सप्टेंबर २०२४:::-आलापल्ली येथील पटेल वार्डातील मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पळल्याने येथील नागरिकांना त्या रस्त्यावर ये जा करण्यास खूप त्रास सहन करावा लागत होता,म्हणून पटेल वार्डातील आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्तींनी आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन

माजी आमदार दिपक दादा आत्राम,

सदर रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची विनंती केले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी स्व खर्चाने स्वता उपस्थित राहून वार्डातील नागरिकांच्या श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करून दिले.

पटेल वार्डातील मुख्य रस्त्याची दुरुस्ती झाल्याने तेथील नागरिकांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले,सदर रस्त्याचे दुरुस्ती वेळी आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रभाकरजी आत्राम,सुरेश उरेत,नामदेव मडावी,हणमंतू कोरेत,आकाश ऊरेत,रीतीक आत्राम,वीक्की कोटरंगे,रोहित अर्का,रचित अर्का,लोकेश मसूलकर,सौन्दर्या गूर्णूले,वंदना मडावी,संजय आक्केवार,वैभव आक्केवार,प्रशांत मित्रावार, उमेश आत्राम,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके सह वार्डातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular