Friday, September 11, 2026
HomeChamorshiआज पासून उमेद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन...

आज पासून उमेद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

ग्रामीण जीवनोन्नती अभियानला पाठिंबा देत, प्रशासना कडून शासनाला इशारा.

गडचिरोली/चामोर्शी, ०३ ऑक्टोंबर २०२४::- ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्याने राज्यव्यापी बंद आंदोलन पुकारला असून चामोर्शी तालुक्यातील उमेद कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने या बंदमध्ये सहभागी होत कडकडीत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. चामोर्शी येथील उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालया समोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद आहे की संघटनेची राज्याचे मुख्यमंत्री व मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांचे सोबत वेळोवेळी बैठक झाली. प्रत्येकवेळी संबंधितांनी लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासित केले. परंतु, अद्यापही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही. १० ते १२ जुलै रोजीच्या आझाद मैदानात आंदोलन केले होते. यावेळी देखील पत्र देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या मागण्या आजपर्यंत पूर्ण न झाल्याने अभियानातील सर्व महिला, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री, ग्राम पंचायत विकास मंत्री व प्रधान सचिव यांना वेळ मागण्यात आला होता. मात्र शासनाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देणे या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दि.३ ऑक्टोंबर पासून कामबंद आंदोलन पुकारले असून या राज्यव्यापी आंदोलनात चामोर्शी येथील उमेद कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला इशारा दिला आहे. यात संबंधित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामध्ये तालुका अभियान व्यवस्थापक तुषार करणे सर, तालुका व्यवस्थापक, भारती पेशत्तीवार, तालुका व्यवस्थापक भावना रामटेके, Account असिस्टंट, ठाकरे, प्रभाग समन्वयक सलोटे, निलेश सिरसम, प्रभाग समन्वयक आकाश दुर्गे, प्रभाग समन्वयक मेश्राम, प्रभाग समन्वयक पित्तुल्वार, प्रभाग समन्वयक मडावी, प्रभाग समन्वयक श्रीमती खोब्रागडे, डाटा ऑपरेटर कु, प्रिती मडावी, शिपाई श्रीमती वनिता कोचे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular