Friday, September 11, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उरते परिवाराला आर्थिक मदत...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उरते परिवाराला आर्थिक मदत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

Gadchiroli/अहेरी, ०७ ऑक्टोंबर २०२४::- तालुक्यातील आलापल्ली वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी दीपक रामचंद्र उरते ( वय 36 वर्ष ) यांच्या ब्रेन ऑपरेशनसाठी नागपूर येथील खाजगी पोक्स हॉस्पिटल येथे भर्ती झाले उरेत परिवार आज पर्यंत खाली वर पडून दीपकला ऑपरेशनसाठी पैसे ठेवले होते.मात्र उरेत परिवार अंत्यत गरीब असून त्यांना पुढील उपचार व औषधसाठी खूपच अडचण भासत होती.आलापल्ली येथील त्यांचे नातेवाईकांना संपर्क करून त्याची आर्थिक परिस्थिती सांगितले होते.आज उरते कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांचे नातेवाईक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना भेटून त्यांची आर्थिक अडचण बाबत सांगितले होते.कंकडालवारांनी उरेत कुटुंबाची अडचण बघून दीपकला पुढील औषध उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,व्येकटेश धानोरकर तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत चुटूगुंटा,बालाजी मडावी,प्रभाकर मडावी,संतोष कोरेत,विनोद तलांडी,राकेश उरेत,अमोल उरेत,कपिल अर्का,दीपक मडावी,अविनाश आत्राम,महेश,रुपेश आत्राम,भूषण डेकाटेसह आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular